
लंडन येथे बुधवारी केल्या गेलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन २०१९ या वर्षासह गेल्या दशकातील सर्वात सेक्सी आशियाई मर्द ठरला आहे. त्याचे वॉर आणि सुपर ३० हे दोन नवे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ४५ वर्षीय हृतिकला ब्रिटीश साप्ताहिक इस्टर्न आयने सेक्सीएस्ट मेलच्या वार्षिक रँकिंग मध्ये प्रथम स्थान दिले असून ही निवड जगभरातील चित्रपट रसिकांची मते सोशल मिडिया नेटवर्क साईटवरील चर्चेतून नोंदली गेली आहेत त्यातून केली गेली आहे. वर्षभरात संबंधित व्यक्तीचा किती प्रभाव पडला यावरून हे रँकिंग दिले गेल्याचे समजते.
हृतिक ठरला दशकातील सर्वात सेक्सी मर्द
हृतिकला यात दुहेरी यश मिळाले आहे. यंदाच्या वर्षीचा तो सेक्सी मर्द ठरलाच पण गेल्या दहा वर्षातील रँकिंग मध्येही तो प्रथम स्थानावर आला. या संदर्भात हृतिकने सर्व चाहत्याना धन्यवाद दिले आहेत. तो म्हणतो, लोकांना मी कसा दिसतो यावर मी माझे मुल्यांकन करत नाही तसेच मी मला कसा वाटतो यावरही करत नाही. कोणतीही व्यक्ती त्याची कहाणी, त्याचा करियर प्रवास, वर्तणूक आणि आयुष्यात आलेल्या सर्व अडचणींना त्याने कसे तोंड दिले यावरूनच जोखली जात असते. माझ्या भूमिका साकारताना मी एक निश्चित मार्ग चोखाळतो कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. त्यासाठी मी भरपूर मेहनत घेतो.
या यादीत दुसऱ्या स्थानावर बॉलीवूड हिरो शाहीद कपूर आहे, तीन नंबरवर टीव्ही अभिनेता विवियन डीसेना हा आहे तर चार नंबरवर युवा पिढीचा आवडता टायगर श्रॉफ आहे.
