आशियात अझीम प्रेमजी ठरले सर्वाधिक दानशूर


प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि विप्रोचे माजी अध्यक्ष अझिम प्रेमजी आशियात सर्वाधिक दानशूर बनले असून टेक कंपनी विप्रो मधील त्याच्या वाट्याचे ७.६ अब्ज डॉलर्स त्यांनी शिक्षणाच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या अझीम प्रेमजी फौंडेशनला दान केले आहेत. फोर्ब्सने नुकतीच आशियातील ३० सर्वाधिक दानशूर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत आशियातील अश्या अब्जाधीश, उद्योजक, सेलेब्रिटींचा समावेश ज्यांनी समाजापुढील महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य सुरु केले आहे.

५० वर्षांच्या कारकिर्दीनंतर प्रेमजी यांनी विप्रोच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली असून आता यापुढचे आयुष्य परोपकार करण्यात घालविण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ब्सचा सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आता अझीम प्रेमजी दुसऱ्या स्थानावरून १७ व्या नंबरवर गेले आहेत कारण त्यांनी दान दिलेल्या प्रचंड संपत्तीमुळे आता त्यांची संपत्ती २०१९ मध्ये ७.२ अब्ज डॉलर्सवर आली आहे. गिव्हिंग प्लेजवर प्रेमजी यांनी सर्वप्रथम सही केली होती. आत्तापर्यंत त्यांनी २१ अब्ज डॉलर्स दान केले असून त्याच्यानंतर या यादीत इंडोनेशियाचे उद्योजक थिमोडोर राचमेट यांचा नंबर आहे. त्यांनी २०१८ पासून आत्तापर्यंत ५ दशलक्ष डॉलर्स दान दिले आहेत. तीन नंबरवर मलेशियातील जेफरी चिया आहेत तर चार नंबरवर अलीबाबाचे माजी प्रमुख जॅक मा हे आहेत.

Leave a Comment