आता सून आणि जावयाला देखील घ्यावी लागणार वृद्धांची जबाबदारी

सरकार ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अंतर्गत वृद्धांची काळजी घेणाऱ्या तरतूदींमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कॅबिनेटकडून केवळ स्वतःची मुलेच नाही तर जावई आणि सुनेला देखील वृद्धांच्या देखभालीसाठी जबाबदार धरण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमध्ये काळजी घेणाऱ्यांमध्ये दत्तक घेतलेले मुले, सावत्र मुलगा-मुलगी यांचा देखील समावश करण्यात आलेला आहे.

पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. नवीन नियमांत आई-वडिल आणि सासू-सासरे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ते ज्येष्ठ नागरिक असो अथवा नसो, त्यांचा यात समावेश असेल. यामध्ये अधिकत्म 10 हजार रुपये मेंटिनेंस देण्याची सीमा देखील समाप्त होण्याची शक्यता आहे.

काळजी घेणारे हे पैसे देऊ शकत नाही, अशा वेळी तक्रार केल्यावर त्यांना 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. जी सध्या 3 महिन्यांची आहे. नवीन नियमांमध्ये घर आणि सुरक्षेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. काळजी घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेली रक्कम ही वृद्ध व्यक्ती, आई-वडिल, मुले आणि नातेवाईक यांच्या राहणीमानाच्या आधारावर निश्चित केली जाईल.

संशोधनात ‘सिनियर सिटीझन केअर होम्स’च्या नोंदणीचे देखील प्रावधान आहे आणि केंद्र सरकार याची स्थापना, संचालन आणि नोंदणीसाठी किमान मानक निश्चित करेल. विधेयकाच्या मसुद्यात ‘होम केअर सर्विसेज’ देणाऱ्या एजेंसीचे नोंदणीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. वृद्धांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्योक पोलीस अधिकाऱ्याला एक अधिकारी नियुक्त करावा लागेल.

Leave a Comment