केबल छोटी असल्यावर फोन चार्ज कसा कराल ?, आनंद महिंद्रांनी सांगितला जुगाड

महिंद्रा अँन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी ट्विटवर शेअर केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकदा मोबाईल चार्जरची केबल छोटी असल्याने फोन चार्ज करण्यास अडचण होत असते. केबल छोटी असल्यामुळे फोन चार्जिंगला लावल्यावर कोठे ठेवायचा हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो. मात्र आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये या प्रश्नाचे सापडले आहे.

आनंद महिंद्रा यांनी छोटी चार्जिंग केबल असल्यावर फोन कसा चार्ज करताना कोठे ठेवायचा याचा जुगाड सांगितला आहे. आनंद महिंद्रा यांनी देखील हा उपाय वापरून पाहिला आहे.

त्यांनी ट्विट शेअर करत लिहिले की, मागील आठवड्यात गोव्याला होतो. मी तेथे हे ट्राय केले आणि कामच झाले. (हा फोटो कोणीतरी मला #whatsappwonderbox मध्ये पाठवला होता.) माझा फोन चार्जिंग करताना एवढा कंपर्टेबल कधीच वाटला नव्हता.

आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. नेटकऱ्यांना देखील हा जुगाड खूपच आवडला व त्यांनी ट्विटवर मजेदार कमेंट्स केल्या.

Leave a Comment