सर्वेक्षण : केवळ 13 टक्के लोकांना समजतात मांजरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव

कॅनडाची युनिवर्सिटी ऑफ गुएल्फमधील डिपार्टमेंट ऑफ एनिमल बायो सायन्सच्या विशेषज्ञांनी मांजरीच्या हावभावावर संशोधन केले आहे. या संशोधनात समोर आले की, त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद आणि त्रास समजता येतो. मात्र खूप कमी लोकांना ही गोष्ट समजते. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये 85 देशातील 6000 लोकांकडून जाणून घेण्यात आले की, त्यांना मांजरीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखता येतात का ?

सर्वेक्षणामध्ये समोर आले की, व्हिडीओद्वारे 60 टक्केच चेहऱ्यावरील भाव ओळखू शकले व त्यातील 13 टक्के लोकांचाच स्कोर 75 टक्के होता. यावरून स्पष्ट होते की, मांजरींच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. मात्र खूप कमी लोक ते ओळखू शकतात.

या रिसर्चमध्ये लोकांना मांजरीचे सायलेंट व्हिडीओ दाखवण्यात आले. प्राण्यांमध्ये मांजर अशी प्रजाती आहे, ज्याचे हावभाव ओळखणे अवघड आहे.

डिपार्टमेंटचे प्रोफेसर जॉर्जिया मेसन म्हणाले की, ते सहज सांगू शकतात की, पाळीव मांजर खूष आहे की नाही. मात्र इतर लोकांना ते हावभाव ओळखता येतात का हे पाहण्यासाठी सर्वक्षण करण्यात आले.

Leave a Comment