लग्नात नवरदेवाचे आगमन अगदी थाटामाटात होते. बँड-गाणी, डान्स करत नवरदेवाची ग्रँड एंट्री होत असते. कोणी घोड्यावर, कोणी हत्तीवर तर कोणी बाईकवर देखील येतात. मात्र या सर्वांपेक्षा मॅक्सिकोचा एक नवरदेव खूप पुढे निघून गेला आहे. मॅक्सिकोच्या एका नवरदेवाने थेट आकाशातूनच धमाकेदार एंट्री केली.
Video : थेट स्काय डायव्हिंग करत मंडपात दाखल झाला नवरदेव
आकाश यादव आणि गननप्रीत सिंह यांच्या लग्नात आकाश थेट एअरक्राफ्टने डाइव्ह करत आला. हे लग्न मॅक्सिकोच्या लॉस काबोस येथे पार पडले. या हटके प्रसंगाचा व्हिडीओ WedMeGood ने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
आकाश सुरूवातीला अशाप्रकारे एंट्री घेणार नव्हता. आधी तो आपले मित्र आणि कुटूंबाबरोबर बोटीतून येणार होता. मात्र काही कायदेशीर कारणांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने अशाप्रकारे एंट्री घेतली.
आकाशच्या या हटके एंट्रीने केवळ नवरीचेच नाही तर नेटकऱ्यांचे देखील मन जिंकले. शेकडो युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
