#CMO कार्यालयाला लागला फडणवीसांचा लळा


मुंबई – मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. काल शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री पदी शिवसैनिक विराजमान झाला. त्यानंतर लगेच ‘सीएमओ महाराष्ट्र’ CMO Maharashtra ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरील देवेंद्र फडणवीस यांचा फोटो काढून त्याठिकाणी मंत्रालयाचा फोटो ठेवला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालय सोशल मीडियावर सरकारने घेतलेले सर्व निर्णय, त्याची माहिती देण्यासाठी अ‌ॅक्टिव्ह असते. त्यासाठी त्यांचे फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंट आहेत. CMO Maharashtra या सोशल मीडिया अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा फोटो होता. आता फडणवीसांचा फोटो CMO Maharashtra या ट्विटर अकाऊंटवरुन हटवून त्याठिकाणी मंत्रालयाचा फोटो लावण्यात आला आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा फोटो CMO Maharashtra च्या फेसबुक अकाऊंटवरून अद्याप काढण्यात न आल्यामुळे तो कधी हटवला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment