
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी या जोडीचा 2015 साली रिलीज झालेल्या चित्रपटाला त्याकाळी लोकांनी चांगलीच पसंती दिली होती आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. त्यातच आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सिनेवर्तृळात होत असतानाच त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पण यावेळी सिक्वेलमध्ये जुनी जोडी दिसणार नाही. या चित्रपटाच्या सिक्वेल अभिषेकच्या जागी सैफ अली खानची वर्णी लागली असल्याची चर्चा आहे. तर राणी मुखर्जी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कायम आहे.
‘बंटी और बबली’च्या सिक्वेलमध्ये सैफची वर्णी
या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी होकार मिळाला असून पुढच्या आठवड्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राणी आणि सैफ बनारसला रवाना होणार असल्याचेही वृत्त आहे. गेली अनेक वर्ष ‘बंटी और बबली’चा सिक्वेल बनवण्याचा विचार दिग्दर्शक शाद अलीच्या डोक्यात होता. त्या प्रोजेक्टवर आता काम सुरू होणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘बंटी और बबली -२ किंवा ‘बंटी और बबली अगेन’ असे या सिक्वेलच नाव असणार आहे.
यापूर्वी हम तुम, तारा रम पम आणि थोडा प्यार थोडा मॅजिक या चित्रपटात राणी आणि सैफ यांनी एकत्र काम केले आहे. आता ११ वर्षांनंतर सैफ आणि राणी पुन्हा एकदा एकत्र येत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
