विंडोज 7 होणार बंद, अपग्रेड आणि सपोर्टविषयी जाणून घ्या सर्वकाही

जर तुमच्याकडे देखील एखादा लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर आहे, जो विंडोज 7 वर काम करतो, तर त्वरित दुसरे विंडोज व्हर्जन अपडेट करून घ्या. कारण लोकप्रिय कॉम्प्यूटर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 7 आता बंद होणार आहे. 14 जानेवारी 2020 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 ला कोणत्याही प्रकारचे अपडेट अथवा सपोर्ट मिळणार नाही. विंडोज 7 वर्ष 2009 मध्ये लाँच झाले होते. कंपनी अपग्रेड करण्यासाठी नॉटिफिकेशन देखील देत आहे. विंडोज 10 मध्ये अपग्रेड करण्याच्या स्टेप्स आणि विंडोज 7 अपडेट बंद झाल्यावर काय करता येईल, हे जाणून घेऊया.

14 जानेवारी 2020 नंतर विंडोज 7 कॉम्प्यूटर काम करणे बंद करतील का ?

तर असे नाहीये. विंडोज 7 सपोर्ट देणे बंद होणार असले तरी कॉम्प्यूटर बंद पडणार नाही. विंडोज 7 कॉम्प्यूटरवर काम करता येईल, मात्र 14 जानेवारीनंतर यात कोणतेही सेक्युरिटी अपडेट मिळणार नाही. त्यामुळे तुमचा कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉप हॅक होवू शकतो. तुम्हाला यावर कोणतेही टेक्निकल सपोर्ट देखील मिळणार नाही.

जगभरातील 80 कोटींपेक्षा अधिक कॉम्प्यूटरला करावे लागेल अपडेट

रिपोर्टनुसार, जगभरात विंडोज 10 सह 80 कोटी कॉम्प्युटर काम करत आहेत. या सर्व कॉम्प्युटर्सना अपग्रेड करावे लागेल. त्यामुळे विंडोज 7 मधून विंडोज 10 मध्ये अपग्रेड करण्यासाठी काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.

विंडोज 10 मध्ये अपग्रेड करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरची स्पीड कमीत कमी 1GHz असणे गरजेचे आहे. याशिवाय कमीत कमी 2 जीबी रॅम आणि 32 जीबी हार्ड डिस्क गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला इंटरनेटची देखील गरज पडेल. अपग्रेड करण्याआधी सर्व फाइल बॅकअप करून घ्या.

विंडोज 8.1 अथवा 10 मध्ये कशाची निवड कराल ?

विंडोज 10 मध्ये अपग्रेड करणे कधीही फायदेशीर आहे. कारण 10 जानेवारी 2023 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोज 8.1 देखील सपोर्ट करणे बंद करेल. त्यामुळे तुम्हाला पुन्हा अपडेट करावे लागेल. तुम्ही विंडोज होम अथवा विंडोज 10 प्रो देखील घेवू शकता.

विंडोज 7 मधून विंडोज 10 मध्ये फ्री अपडेट करता येईल का ?

विंडोज 10 लाँच झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने 29 जुलै 2016 पर्यंत फ्री अपग्रेड करण्याची ऑफर दिली होती. मात्र आता विंडोज 7 अपग्रेड करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

Leave a Comment