या दोन कुत्र्यांची काळजी घ्या आणि मिळवा तब्बल 29 लाख रुपये पगार

लंडनच्या नाइट्सब्रिज येथे राहणाऱ्या जोडप्याच्या घरी अशी नोकरी आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कामामुळे हे जोडपे अधिकतर घराबाहेरच असते. यामुळे ते अशा व्यक्तीच्या शोधात आहे, जो त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या दोन गोल्डन रिट्रीवर डॉग्सची काळजी घेऊ शकेल.

या कामाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी ते 30 ते 32 हजार पाउंड्स (जवळपास 29 लाख रुपये) पगार देणार आहेत. याशिवाय आपल्या 6 मजली अलिशान घरात राहण्यासाठी जागा देखील देणार आहेत.

या रिट्रीवर प्रजातीच्या कुत्र्यांच्या नावे मायलो आणि ऑस्कर आहे. जोडप्याने नोकरीची जाहिरात Silver Swan Search नावाची वेबसाइटवर टाकली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांना कशाप्रकारचा कर्मचारी हवा आहे.

(Source)

नोकरीसाठी येणाऱ्याने या आधी देखील कुत्र्यांची काळजी घेतलेली असावी. हाउसकिपिंगचा देखील अनुभव असावा. जेवण बनवायला येत असेल तर आणखीनच चांगली गोष्ट आहे. व्यक्ती फिट आणि एक्टिव असावा. याचबरोबर विश्वासू आणि मेहनती हवा. आठवड्याचे पाच दिवस सोमवार ते शुक्रवार काम आणि 29 लाखांपेक्षा अधिक पगार मिळेल.

Leave a Comment