7.05 अब्ज रुपये दान केल्यानंतरही ट्रोल होत आहेत जेफ बेझॉस

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी 98.5 मिलियन डॉलर म्हणजेच 7 अब्ज 5 कोटी रुपये दान करणार असल्याची घोषणा केली आहे. जेफ बेझॉस एवढी मोठी रक्कम बेघरांना मदत करणाऱ्या 23 राज्यातील 32 संघटनांना देणार आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 110 बिलियन डॉलर एवढी आहे.

दान करणे हे चांगले काम आहे. बेझॉस यांनी दान केलेली रक्कम तर खूपच मोठी आहे. मात्र एवढी मोठी रक्कम दान केल्यानंतर देखील त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

जेफ बेझॉस यांनी रक्कम दान केल्याची माहिती फॉर्ब्स मॅग्झिनने ट्विट करत दिली. फॉर्ब्सच्या ट्विटला उत्तर देत ब्रिटनच्या लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी लिहिले की, जेफ यांनी दान केलेली रक्कम ही त्यांच्या कमाईच्या 0.09 टक्के आहे. त्यापेक्षा आपला टॅक्सा भरा.

https://twitter.com/siano4progress/status/1199008125824765953

या ट्विटनंतर इतर युजर्सनी देखील आकडे मांडत जेफ बेझॉस यांच्यावर निशाणा साधला. एका युजरने लिहिले की, ते प्रत्येक 24व्या मिनिटाला 60 हजार डॉलर कमतात. या प्रकारे ते दर सेंकदाला एवढे पैसे कमवतात की, ज्याद्वारे शेकडो लोकांना जेवण दिले जावू शकते.

https://twitter.com/exhale_chaos/status/1199144471851438080

तर एका युजरने लिहिले की, ही रक्कम काहीशी अशी आहे जसे की, वर्षाला 50 हजार डॉलर कमवणाऱ्या व्यक्तीने 45 डॉलर दान केले आहेत आणि याचबरोबर तो कोणताही टॅक्स देखील भरत नाही.

अन्य नेटकऱ्यांनी देखील जेफ बेझॉस यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Comment