जगभरात अनेक प्रकारच्या शर्यती घेतल्या जातात. मात्र थायलंडमध्ये दरवर्षी घेण्यात येणारी स्पर्धा सर्वात अनोखी आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये वेडिंग पॅकेज जिकंण्यासाठी शर्यत घेण्यात आली. यामध्ये 300 युवती नवरीचा ड्रेस घालून धावल्या. शर्यत जिंकणाऱ्या युवतीला 71 लाख रुपयांचे लग्नाचे पॅकेज देण्यात आले.
71 लाखांचे पॅकेज जिंकण्यासाठी वेडिंग ड्रेस घालून धावल्या 300 तरूणी
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरूणींचे लग्न अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला जातो. सोबतच हे लग्नाचे पॅकेज जिंकून लग्न भव्यदिव्य करण्याची देखील संधी दिली जाते.
या स्पर्धेची खास गोष्ट म्हणजे यात नवरीसोबतच नवरदेव देखील धावू शकतात. मागील वर्षी जवळपास 100 नवरींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
