ट्विटरच्या माध्यमातून गडकरी आणि शहा यांच्या फडणवीसांना शुभेच्छा


मुंबई – अनाकलनीय राजकीय भूकंप राज्यामध्ये झाला असून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राजभवनात शपथ दिली.


या दरम्यान भाजपध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मला विश्वास आहे की, हे सरकार विकास आणि कल्याणासाठी काम करेल आणि महाराष्ट्रात विकासाचा नवा आयाम तयार होईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल, हा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment