भौतिकशास्त्रात महिलेला मिळाले 0 गुण, गुगलच्या सीईओनी केले कौतूक

सर्वसाधारणपणे परिक्षेत कमी गुण मिळाल्यास मुलांना ओरडतात. मात्र जगात असेही लोक आहेत, जे परिक्षेत शून्य गुण मिळाले तरी देखील कौतूक करतात. क्वांटक फिजिक्स (भौतिकशास्त्र) मध्ये शून्य गुण मिळालेल्या एका महिलेचे स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कौतूक केले आहे.

सरफिना नेंस नावाच्या एका महिलेने ट्विट केले की, 4 वर्षांपुर्वी क्वांटम फिजिक्स परिक्षेत मला 0 गुण मिळाले. मी माझ्या पोफ्रेसरला या भितीने भेटले की, मला माझा मुख्य विषय बदलावा लागेल व फिजिक्स सोडावे लागेल. आज मी एका उच्च स्तरावरील एस्ट्रोफिजिक्स पीएचडी प्रोग्रामचा भाग आहे व 2 पेपर प्रकाशित केले आहेत. STEM – सर्वांसाठी कठिण आहे. मात्र ग्रेडचा अर्थ असा नाही की, तुम्ही ते करण्यास सक्षम नाही.

सरफिना नेंसच्या या ट्विटला रिप्लाय देत सुंदर पिचाई यांनी म्हटले की, बरोबर म्हणालीस, हे प्रेरणादायी आहे. पिचाई यांच्या ट्विटनंतर महिलेने देखील त्यांचे आभार मानले.

Leave a Comment