तुम्ही इतिहासामध्ये अनेक राणी आणि राजकुमारींच्या सुंदरतेबद्दल ऐकले असेल. इतिहासात अशा सुंदर राणी आणि राजकुमारींची नोंद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजकुमारीबद्दल सांगणार आहोत, जी जगभरात आपल्या सुंदरतेमुळे ओळखली जाते.
जगातील सर्वात सुंदर राणी, जिच्या रहस्यमयी जीवनावर आजही होत आहे संशोधन
मिस्त्रची (इजिप्त) राजकुमारी क्लिओपात्राला सुंदरतेची देवी म्हटले जाते. क्लिओपात्राला केवळ आपल्या सुंदरतेमुळेच नाही तर अनेक रहस्मयी घटनेसाठी ओळखले जाते. क्लिओपात्रा जेवढी सुंदर होती, तेवढीच चतूर आणि कारस्थानी देखील होती.
वडिलांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांच्या वयात क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टोलमी दियोनिसस यांनी संयुक्तरित्या राज्य केले. भावाला क्लिओपात्राची सत्ता सहन न झाल्याने त्याने उठाव केला. क्लिओपात्राला आपली सत्ता सोडावी लागली आणि सीरियामध्ये शरणागती पत्कारावी लागली.
रोमचा शासक ज्यूलियस सीझरला आपल्या जाळ्यात अडकून क्लिओपात्राने इजिप्तवर हल्ला केला. सीझरने टोलेमीचा पराभव करून क्लिओपात्राला इजिप्तच्या सिंहासनावर बसवले.

क्लिओपात्राचा मृत्यू देखील एक रहस्य आहे. रोमन साम्राज्याचे पहिले सम्राट ऑगस्टसने क्लिओपात्राला हरवून आपले शासन स्थापित केले होते. शोधानुसार, ऑगस्टसने स्वतःच्या सन्मानार्थ वर्षातील एका महिन्याचे नाव स्वतःच्या नावावरून ठेवले आहे. क्लिओपात्राला ज्या महिन्यात हरवले व तिचा मृत्यू झाला तो आठवा महिना त्याने निवडला.

ऑगस्ट्स क्लिओपात्राला रोममध्ये बंदी स्वरूपात ठेवणार होता. मात्र त्याला थांबवण्यासाठी क्लिओपात्राने स्वतः आत्महत्या केली. क्लिओपात्राने लज्जित आणि असाहय्य जगण्याऐवजी मृत्यू पसंद केला. क्लिओपात्रा इतिहासातील सर्वात रहस्यमयी व्यक्तींपैकी एक आहे.

