
याआधी अनेकदा हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करण्यावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाने आक्षेप घेतला आहे. पण जगभरातील अनेक भाषांमध्ये ‘तान्हाजी : द नसंग वॉरियर’ हा हिंदी भाषेतील ऍक्शनपट डब व्हावा अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. अजय देवगणने याच ट्विटला उत्तर देत मनसेचे आभार मानले आहेत व हिंदीसोबतच मराठीत डब करून हा चित्रपट रिलीज करणार असल्याचे सांगितले.
आता मराठीतही डब होणार ‘तान्हाजी’
Thank you 🙏 Ameya & MNS for allowing us to showcase our film Tanhaji in Marathi & Hindi simultaneously. It’s our privilege to be able to share the story of this brave Maratha warrior in his mother tongue as well as the National Language🙏 https://t.co/ds21FiaDd9
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 20, 2019
आपल्या ट्विटर हॅण्डलवर अजयने लिहिले आहे की, आमचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट हिंदी व मराठी भाषेत रिलीज करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेय आणि मनसेचे मी आभार मानतो. शूरवीर मराठा योद्धाची यशोगाथा त्यांच्या मातृभाषेत त्याचसोबत राष्ट्रीय भाषेत प्रेक्षकांना दाखवणे हा आमचा सन्मान आहे. या चित्रपटाला मनसेने मराठीत डब करण्यासाठी होकार देण्यामागचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा पराक्रमी मावळा तान्हाजी यांच्या शौर्याची गाथा जी देशभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी.
दरम्यान, ओम राऊतने इतिहासावर आधारित असणाऱ्या या नव्या ऍक्शनपटाचं दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अजय देवगण तान्हाजी ही प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर काजोल या तान्हाजी यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसतील.
