विम्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने थेट मृतदेह घेऊन ऑफिसात दाखल झाले कुटूंब

जीवन विमा घेण्या मागे उद्देशच हा असतो की, अचानक मृत्यू झाल्यास कुटूंबाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू नये. कोणत्याही अडचणीत हा विमा मदतीस येईल. मात्र अनेकदा असे ऐकायला मिळते की, विमा कंपन्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम देण्यापासून टाळाटाळ करतात. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेत घडला आहे. येथे जेव्हा विमा कंपनीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला, तेव्हा मृताचे नातेवाईक थेट मृतदेह घेऊनच ऑफिसात दाखल झाले.

(Source)

46 वर्षीय सिफिसो म्हेल्गो यांचे 7 नोव्हेंबरला निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटूंब विमा घेण्यासाठी कंपनीच्या ऑफिसात गेले. मात्र कंपनीने सिफिसो यांचे निधन झाले असल्याचे मानण्यासच नकार दिला. परिवाला त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्यास सांगण्यात आले.

(Source)

त्यानंतर सिफिसो यांचे कुटूंब त्याचे शव घेऊन विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Source)

प्रकरण चिघळल्याचे लक्षात येताच ओल्ड म्युच्यूअल नावाच्या विमा कंपनीने आपले म्हणणे मांडले आहे. कंपनीने म्हटले की, या कठिण प्रसंगात आम्हाला कुटूंबाप्रती सहानभूती आहे. त्यांना विम्याची रक्कम देण्यात आलेली आहे.

Leave a Comment