
नुकताच अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सोशल मीडियावर या ट्रेलरची खूपच प्रशंसा झाली. पण आता या चित्रपटाचा ट्रेलर वादात सापडला आहे. कोटा शहराचे नाव या चित्रपटामुळे मलिन झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ मुळे मलिन झाले कोटा शहराचे नाव
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कोटा शहरातील काही स्थानिकांनी भेट घेतली. अशाप्रकारे शहराचे नाव मलीन करणे पूर्णपणे चुकीचे असून चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी त्याच शहराच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याची अशी प्रतिक्रिया कोटा शहराच्या स्थानिकांनी माध्यमांना दिली आहे.
या चित्रपटात मुलींचं अपहरण करून, त्यांच्यावर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या एका माथेफिरू नराधमाचा शोध घेणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट आहे. पण कोटा हे शहर विद्येचे असून चित्रपटातील या शहराचे नाव काढून टाकावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
