
भारतात येऊन सनबर्न म्युझिक फेस्टीव्हलमध्ये परफॉर्म करायला फ्रान्सचा लोकप्रिय ‘डीजे स्नेक’ तयार झाला असून तो मुंबईत या वर्षाच्या सुरुवातील आला होता. ‘लेट मी लव यू’, ‘लीन ऑन’ यासारख्या गाण्यासाठी प्रसिध्द असलेला डीजे स्नेक आपला नवा अल्बम ‘कार्ते ब्लांचे’मधील गाण्यावर भारतात परफॉर्म करेल.
गोवा सनबर्नमध्ये आपला जलवा दाखवणार फ्रान्सचा ‘डीजे स्नेक’
याबाबत डीजे स्नेक म्हणाला, मी भारतात परत येण्यासाठी उत्साही आहे. जेव्हा मी तिथे होळीच्या वेळी होतो, तेव्हा भरपूर सकारात्मक उर्जा आणि जोश अनुभवला आहे. तुम्ही कामाच्या निमित्ताने जेव्हा गेले असताना सण साजरा होत असतो आणि त्याचा जेव्हा अर्थ कळतो तेव्हा हा अनुभव नेहमी शानदार असतो. जेव्हा मी प्रवास करीत असतो तेव्हा मी शिकण्याला प्राधान्य देतो. गोवा दौऱ्यावर ‘कार्ते ब्लांचे’ अल्बमधील गाणी सादर करण्यासाठी डीजे स्नेक खूप उत्साहित झाला आहे. २७ डिसेंबरपासून गोव्यात सनबर्न फेस्टीव्हल सुरू होत आहे.
