‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय-रोहितचा राडा


रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मूख्य भूमिका साकारत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. पण चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द करण जोहरही त्यांच्यातला वाद सोडवू शकत नसल्याचे स्वतः करण जोहरनेच म्हटले आहे.


खरंतर, अक्षय आणि रोहितचा ‘सूर्यवंशी’च्या सेटवर वाद झाल्याच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्या दोघांमध्ये भांडण झाल्याचे काही माध्यमांमध्ये समोर आले होते. पण एक व्हिडिओ शेअर करून दोघांच्या वादाच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे अक्षयने सांगितले आहे.


रोहित आणि अक्षय त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खोटी खोटी हाणामारी करताना पाहायला मिळतात. यामध्ये अक्षय म्हणतो, की आपल्याला भांडण करावेच लागेल. या व्हिडिओत कॅटरिना कैफही पाहायला मिळते. या व्हिडिओवर ‘हा वाद तर मी देखील सोडवू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक करण जोहर याने दिली आहे.

Leave a Comment