युट्यूबवर भूत बनून प्रँक करणे पडले महागात,7 जणांना जेल

अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टसाठी अथवा व्हिडीओसाठी युजर्स कोणत्याही थराला जातात. मात्र कधीकधी या व्हिडीओच्या नादात जेलची वारी देखील होऊ शकते. अशीच काहीशी घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. भूत बनून प्रँक करणाऱ्या 7 युट्यूबर्सला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती भूताच्या वेषात रिक्षा आणि दुचाकीस्वरांच्या दिशेने धावत आहे. याशिवाय झोपलेल्या माणसाला देखील ते घाबरवताना दिसत आहेत.

हे सर्व युवक 20 वर्षांचे आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनेल “Kooky Pedia” साठी ते प्रँक व्हिडीओ बनवत होते. मात्र रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात शान मलिक, निवाद, सॅम्युअल मोहम्मद, मोहम्मद आयुब शाकीब, सय्यद नाबील आणि युसूफ अहमद यांना अटक करण्यात आली होती. यातील दोघांना जामीन देण्यात आला आहे.

Leave a Comment