व्हिएतनामच्या जंगलात तब्बल 30 वर्षांनी आढळला हा दुर्मिळ प्राणी

व्हिएतनामच्या जंगलामध्ये एक दुर्मिळ हरिणासारखा प्राणी आढळला आहे. जवळपास 30 वर्षानंतर हा दुर्मिळ प्राणी दिसला आहे. याआधी 1990 मध्ये हा प्राणी दिसला होता. याला सिल्वर बॅकेड चेव्रोटेन किंवा माउस डिअर असे देखील म्हणतात.

व्हिएतनाममधील न्हा ट्रॉग येथे 1910 मध्ये काही प्राणी आढळले होते. त्यावेळी सर्वात प्रथम हा प्राणी आढळला होता. 1990 नंतर हा दुर्मिळ प्राणी दिसला नसल्याने विशेषज्ञाच्या मते, शिकारीमुळे हा प्राणी नामशेष झाला आहे.

व्हिएतनामचे जीवशास्त्रज्ञ यांनी ग्लोबल वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन आणि आपल्या काही सहकार्यांबरोबर मिळून या दुर्मिळ प्राण्याचा शोध घेतला. यासाठी त्यांनी 30 पेक्षा अधिक मोशन-एक्टिवेटेड कॅमेरे जंगलात लावले. या कॅमेऱ्यामध्ये या दुर्मिळ माउस डिअरचे फोटो कैद झाले.

Leave a Comment