भारतीय वंशाची अमेरिकन मॉडेल रॅचल व्हाईट हे बंगाली चित्रपटसृष्टीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. रॅचल सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव असते.
ती इमरान हाश्मी आणि संजय दत्तच्या ‘उंगली’ चित्रपटातही दिसली आहे.
#MeToo चळवळीच्या वेळी रॅचलचेही नाव पुढे आले. त्यावेळी तिने निर्माता साजिद खानने कित्येक महिन्यांपासून मानसिक लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता.
रॅचलचा अंदाज खूप ग्लॅमरस आहे. ती अनेकदा आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिने अनेक वेळा आपले बिकिनीमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांच्या हृदयाची गती देखील वाढवली आहे.
तिचे चाहते देखील तिच्या नव्या फोटोंची वाट पाहत असतात.
रॅचलचा जन्म अमेरिकेच्या अलाबामा येथे झाला होता. तिने संगणक शास्त्रामध्ये पदवी घेतली आहे.
त्यानंतर ती भारतात आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. रॅचल तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते.