बँकेत काम करणाऱ्या 30 वर्षीय निक बटरने एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. निकने 196 देशांमधील 196 मॅरोथॉनमध्ये भाग घेण्याची कामगिरी केली आहे. 22 महिन्यात त्याने ही कामगिरी केली.
जगातील 196 देशातील मॅरोथॉनमध्ये धावण्याचा या 30 वर्षीय बँकरने केला विक्रम
त्याच्या एका मित्राला कॅन्सर झाला. याचा त्याच्या जीवनावर खूपच प्रभाव पडला. या विचारात त्याने बँकिगची नोकरी देखील सोडली व स्वतःचे आयुष्य स्वतःच्या नियमांवर जगण्याचा निश्चय केला.
निक तीन आठवड्यात तीन नवीन देशात जातो आणि तेथील मॅरोथॉनमध्ये धावण्याची कामगिरी करतो. जगात पहिल्यांदाच असा विक्रम कोणी केला असेल.
हा विक्रम बनवताना निकला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. एकदा तर कुत्रेच त्याला चावले तर कधी गाडीने ठोकले. त्याने या सर्व मॅरोथॉनद्वारे 250000 डॉलरची फंडिग जमा केली आहे. आता हा पैसा तो कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरणार आहे.
निकने सांगितले की, मॅरोथॉनचा त्याचा अनुभव स्पेशल होता. एवढेच नाही तर यामुळे त्याच्या फोनमध्ये 2000 नंबर जोडले गेलेत. लोकांनी त्याची खूप मदत केली.
एवढेच नाही तर तो सहारापासून ते सर्वाधिक थंडीच्या ठिकाणी देखील धावला. त्याने सांगितले की, प्रत्येक देशाने काहीतरी नवीन शिकवले. त्याने अशी कामगिरी केली आहे, जी भविष्यात करणे अशक्य आहे.
