5 पॉप-अप कॅमेऱ्यासोबत लवकरच लाँच होणार शाओमीचा फोल्डेबल फोन

गेल्या काही दिवसांपासून फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ वाढताना दिसत आहे. सॅमसंग आणि ह्युएईच्या घोषणेनंतर आता चीनी स्मार्टफोन कंपनी फोल्डेबल फोनची तयारी सुरू केली आहे. शाओमीने काही दिवसांपुर्वी फोल्डेबल फोनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्यानंतर या फोनची माहिती समोर आली आहे.

शाओमीने काही दिवसांपुर्वीच पाच रिअर कॅमेरे असणारा एमआय सीसी9 प्रो हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनला एमआय नोट 10 नावाने देखील ओळखले जाते. आता कंपनी आपल्या या पाच रिअर कॅमेरा टेक्निकचा वापर फोल्डेबल फोनमध्ये करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून अद्याप या फोनच्या लाँचिंग डेटबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. असे असले तरी पुढील काही महिन्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

कंपनीच्या फोल्डेबल फोनच्या पेटंटचे काही फोटो समोर आले आहेत. यात पॉप अप कॅमेऱ्यात 5 सेंसर्स दिसत आहेत. डिझाईनवरून दिसत आहे की, हा कॅमेरा सेटअप फ्रंट आणि रिअर दोन्हीसाठी काम करेल. फोनला अनफोल्ड केले तर पॉप-अप कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला दिसत आहे. शाओमीचा हा बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन 74 हजार रुपयांपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी फोल्डची किंमत जवळपास 1,40,000 रुपये आहे. तर ह्युएई मेट एक्सची किंमत भारतात 1 लाख 85 हजार आहे.

 

Leave a Comment