फेसबुकच्या मालकीचे इंस्टट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नुकतेच एक नवीन अपडेट लाँच केले आहे. मात्र अॅप अपडेट केल्यानंतर स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत.
व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे होत आहे स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम
युजर्सच्या तक्रारीनुसार, ही समस्या आयफोनसाठी नवीन व्हर्जन लाँच केल्यानंतर येत आहे. आयफोन युजर्सशिवाय अँड्राईड युजर्स देखील व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमुळे बॅटरीवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपने याच आठवड्यात आयफोनसाठी नवीन व्हर्जन 2.19.112 आणले आहे. फोनच्या बॅकग्राउंडमध्ये व्हॉट्सअॅप सतत एक्टिव असल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होत आहे.
