या दिवशी रिलीज होणार अजय देवगणचा ‘मैदान’


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा ‘मैदान’ हा चित्रपट येणार आहे. फुलबॉलवर आधारित हा चित्रपट असून अजयने काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही आता जाहीर करण्यात आली आहे.


पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगनने अलिकडेच या चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरं शेड्यूल पूर्ण केले आहे. हे शूटिंग मुंबई येथे पार पडले. अभिनेते गजराज राव हे देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर करत आहेत. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा हे करत आहेत. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल. अजय देवगन या चित्रपटाशिवाय ‘भुजः प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याचा ‘तानाजीः द अनसंग वॉरियर’ हा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आले होते.

Leave a Comment