Video : याला म्हणतात जुगाड, या पठ्ठ्याने थेट बाईकलाच बदलले कारमध्ये

पंजाबच्या लुधियाना येथील एक विचित्र गाडी बघून सर्वचजण हैराण झाले. कारण ही गाडी होतीच एवढी विचित्र की, सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. एका व्यक्तीने आपल्या बाईकलाच थेट कारमध्ये बदलले आहे. बाईकला एवढ्या जबरदस्त पद्धतीने जीपमध्ये बदलले आहे की, ती बाईक वाटतच नाही. एका ट्विटर युजरने या गाडीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, गाडीच्या पुढील बाजूला दोन सीट आहे, एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला विचारल्यावर तो सांगतो की, ही गाडी त्याने स्वतःच तयार केली आहे. त्याने हे देखील सांगितले की, अजून गाडीचे बरेच काम बाकी आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक वेळा बघितला असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

अनेक युजर्सनी या जुगाडू व्यक्तीचे कौतूक केले.

 

Leave a Comment