गुजरातच्या मणिनगर येथील श्रीस्वामीनारायण मंदिरातील देवाच्या मुर्तीला तब्बल 175 किलो सोन्यांच्या आभुषणांनी सजवण्यात आले आहे. या आभूषणांची किंमत 100 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने संपुर्ण मंदिर रोषणाईने झळाळून उठले आहे. मंदिराचे सदस्य पुरूषोत्तम प्रियदासजी यांनी सांगितले की, धन जोपर्यंत धर्माच्या चरणांवर असते, तोपर्यंत त्याला किंमत असते. यामुळे धनतेरस हे धर्मतेरस म्हणून साजरे केले पाहिजे.
100 कोटींच्या आभुषणांनी सजवण्यात आली या मंदिरातील देवाची मुर्ती
![]()
देवाच्या मुर्तीच्या चरण पादुका या सोन्याच्या आहेत. याशिवाय मुर्तीवर अर्पण करण्यात आलेली फूल सोन्याची आहेत. देवाला रत्नजडित नवलखा हाराने सजवण्यात आले आहे.
बाजूबंद, हातकडे देखील सोन्याचे असून, त्याला हिरे लावण्यात आलेले आहेत. याशिवाय 6 किलोग्राम वजनाची सोन्याची बिस्किटे असून, त्यांच्यावर हिरे लावण्यात आलेले आहेत.
