ठाणे – महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांकरिता मुंबई, ठाणे,पालघरसह महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदाराचा निरूत्साहच पाहायला मिळाला. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील ठाणे-पालघरमधील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.
- ठाणे – पालघर विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार
- डहाणू मतदार संघातून सीपीएमचे विनोद निकुळे 71140 मतांनी विजयी
- विक्रमगड मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत भुसारा 88264 मतांनी विजयी
- पालघर मतदार संघातून काँग्रेसचे योगेश नाम 27687 मतांनी विजयी
- बोईसर मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील 78,671 मतांनी विजयी
- नालासोपारा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर 1,48,952 मतांनी विजयी
- वसई मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 97244 मतांनी विजयी
- भिवंडी-ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे शांतारम मोरे 83367 मतांनी विजयी
- शहापूर मतदार संघातून काँग्रेसचे दौलत दरोडा 75804 मतांनी विजयी
- भिवंडी पश्चिम मतदार संघाचे भाजपचे प्रभाकर चौघुले 58816 मतांनी विजयी
- भिवंडी पूर्व मतदार संघातून समाजवादी पार्टीचे रईस शेख 45531 मतांनी विजयी
- कल्याण पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर 38314 मतांनी विजयी
- मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कठोरे 1,46894 मतांनी विजयी
- अंबरनाथ मतदार संघातून शिवसेनेचे डॉ बालाजी किनीकर 59862 मतांनी विजयी
- उल्हासनगर मतदार संघातून भाजपचे कुमार अलियानी 43577 मतांनी विजयी
- कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे गणपत गायकवाड 45413 मतांनी विजयी
- डोंबिवली मतदार संघातून भाजपचे रविंद्र चव्हाण 86,110 मतांनी विजयी
- कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनेसेचे प्रमोद (राजू)पाटील 90816 मतांनी विजयी
- मिरा-भाईंदर मतदार संघातून अपक्ष उमेदवार गीता जैन 79,527 मतांनी विजयी
- माजिवाडा-ओवला मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक 1,05,769 मतांनी विजयी
- कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून शिवसनेचे एकनाथ शिंदे 1,06,667 मतांनी विजयी
- ठाणे मतदार संघातून भाजपाचे संजय केळकर 91,771 मतांनी विजयी
- मुंब्रा-कळवा मतदार संघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1,09,014 मतांनी विजयी
- ऐरोली मतदार संघातून भाजपच्या गणेश नाईक 1,14,038 मतांनी विजयी
- बेलापूर मतदार संघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी 87518 मतांनी विजयी