ट्रिपल रिअर कॅमेरा असणाऱ्या ‘मोटो’चा दमदार फोन बाजारात दाखल

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने जी सीरिजमधील आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी8 प्लस भारतात लाँच केला आहे. याआधी कंपनीने मोटोरोला वन मॅक्रो भारतात लाँच केला होता. मोटो जी 8 प्लसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि अँड्राईड पाय 9 सपोर्ट मिळेल. याशिवाय अनेक खास फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.

किंमत आणि ऑफर्स –

मोटोरोलाने ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन या फोनची किंमत 13,999 रूपये ठेवली आहे. याशिवाय जिओ या फोनच्या खरेदीवर 2,200 रूपये कॅशबॅक आणि 2000 रूपयांचे वाउचर्स देईल. हा फोन या महिन्याच्या अखेरीस फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

(source)

स्पेसिफिकेशन –

ग्राहकांना यामध्ये 6.3 इंच फूल एचडी + डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिजॉल्यूशन 1080×2280 पिक्सल आहे. यात यू-शॉप नॉच देखील मिळेल. चांगल्या परफॉर्मेंससाठी यात ऑक्टो कोर स्नॅपड्रॅगन 665 एसओसी प्रोसेसर देण्यात आला असून, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज या फोनमध्ये मिळेल.

(Source)

कॅमेरा –

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आहे. तर दुसरा कॅमेरा 16 मेगापिक्सल व तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये मिळेल.

कनेक्टिविटी आणि बॅटरी –

कॅनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, ए-जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स मिळतील. या स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, ती 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल.

 

Leave a Comment