जर्मनीची लग्झरी कार कंपनी मर्सिडीज बेंझने आपली नवीन शानदार एसयुव्ही जी 350 डी भारतात लाँच केली आहे. या एसयुव्हीची एक्स शोरूम किंमत 1.50 कोटी आहे. मर्सिडीज बेंझ ही पहिली नॉन-एएमजी आणि डिझेल व्हर्जन असणारी जी-क्लास एसयुव्ही आहे.
मर्सिडीज बेंझने लाँच केली दीड कोटींची एसयुव्ही

मर्सिडीज बेंझमध्ये बीएस 6 कंप्लायंट 3.0 लीटर 6 सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल. हे 282 bhp पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन 9 स्पीड क्नवर्टर मिळेल.

बॉक्स लूकमुळे ही एसयुव्ही अधिकच शानदार दिसत आहे. याशिवाय यात राउंड हेडलॅम्पस हे डेलाईट एलईडीसोबत आहेत. टेललाईट्स एलईडी, आणि थ्री पॉईंटेड स्टार लोगो अधिकच आकर्षित वाटतो.

याशिवाय 12.3 इंच इफोटेन्मेंट सिस्टम डिस्प्ले देण्यात आला आहे. यात लेटेस्ट एमबूक्स इंटरफेस आहे. ही 5 सीटर एसयुव्ही असून, अधिक जागा देखील यात मिळेल. मर्सिडीज जी 350 डी ही संपुर्ण बिल्ट अप (सीबीयू) स्वरूपात भारतात येणार आहे.
