देशातील या 5 मोठ्या दानशूर अब्जाधीशांनी दान केला पैशाचा मोठा हिस्सा


हुरुन इंडियाने देशातील सर्वात दानशूर लोकांची यादी जाहीर केली असून हुरुनच्या अहवालानुसार परोपकारासाठी सर्वाधिक रक्कम देणाऱ्यांच्या यादीत शिव नादर हे अव्वल स्थानी आहेत. आम्ही आज तुम्हाला परोपकारासाठी कोणत्या उद्योगपतीने किती दान केले आहेत याची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत त्या व्यक्ति…

या यादीत पाचव्या स्थानी पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे नाव आहे. अहवालानुसार त्यांनी धर्मादाय संस्थेसाठी 200 कोटी रुपये दान केले आहेत.

या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आहेत. अहवालानुसार त्यांनी परोपकारासाठी एकूण 204 कोटींची रक्कम दिली.

दानशूरांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण 402 कोटी रुपये दान केले आहेत.

या यादीमध्ये विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परोपकारासाठी त्यांनी एकूण 453 कोटी रूपये दान केले.

परोपकार करणार्‍यांच्या पहिल्या क्रमांकावर एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांचे नाव आहे. 2019 च्या अहवालानुसार शिव नादर यांनी एकूण 826 कोटी रुपये दान केले आहेत.

Leave a Comment