
अंबिकापूर : आजपासून देशातील पहिले गार्बेज कॅफे (Garbage Cafe) अंबिकापूरमध्ये सुरु होणार आहे. गार्बेज कॅफेचे उद्घाटन आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव करणार आहे. रस्त्यावरील प्लास्टिक आणून या गार्बेज कॅफेमध्ये दिल्यास जेवण मोफत मिळण्याची सुविधा मिळणार आहे.
या ठिकाणी प्लस्टिकच्या बदल्यात मिळते मोफत जेवण
छत्तीसगढमध्ये हे पाऊल प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. छत्तीसगढमधील अंबिकापूरनगर निगमने प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात येण्यासाठी गार्बेज कॅफे सुरु करण्यात आला आहे.
२४ तास गार्बेज कॅफे सुरु राहणार आहे. गार्बेज कॅफे सुरु होण्याआधीच हा चर्चेचा विषय बनला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १ किलो प्लास्टिक आणल्यास, एकवेळचे भरपोट जेवण मिळणार आहे. तर ५०० ग्रॅम प्लास्टिक आणल्यास ब्रेकफास्ट मोफत मिळणार आहे.
रस्ते बनवण्यासाठी या कॅफेमधून जमा होणारे प्लास्टिक वापरण्यात येणार आहे. याआधी देखील शहरात प्लास्टिकचे तुकडे आणि डांबरपासून रस्ते बनवण्यात आले होते. बजेटमध्ये या गार्जेब कॅफेसाठी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत. या अंतर्गत नगर निगम गरीब आणि बेघर लोकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे.
