पोलिसांच्या वर्दीचा फोटो कतरिना कैफने केला शेअर


आपल्या आगामी ‘सूर्यवंशी’च्या शूटिंगमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ व्यस्त आहे. असे सांगितले जात आहे की, हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे आणि एक फोटो चित्रपटाच्या सेटवरून समोर आला आहे. अनेक प्रकारचे ज्यावरून अंदाज वर्तवले जात आहे. आपला एक फोटो कतरिनाने शेअर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांची वर्दी दिसत आहे आणि त्यावर नेम प्लेट लागलेली आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोवरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा फोटो सूर्यवंशी चित्रपटाशी संबंधित आहे. ‘वीर सूर्यवंशी’ हे नाव या फोटोमधील वर्दीवर लिहिलेले दिसत आहे. त्यावरून हादेखील अंदाज वर्तवला जात आहे की, या चित्रपटात अक्षय कुमारचे नाव वीर सूर्यवंशी आहे, कारण चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.


त्यासोबतच हेदेखील कळाले आहे की, अजय देवगन आणि रणवीर सिंहदेखील चित्रपटात दिसणार आहेत, या चित्रपटात ते पाहुणे कलाकार म्हणून दिसू शकतात. रोहित शेट्टीचा हा पोलिस बेस्ड ड्रामा कॅटॅगरीमधील चौथा चित्रपट आहे. यापूर्वी ‘सिंघम’, ‘सिंघम-2’, ‘सिंबा’ रिलीज झाले आहेत.

Leave a Comment