4999 रूपये द्या आणि घेऊन जा या कंपनीची दुचाकी

फेस्टिव सीझनच्या काळात अनेक कंपन्या आपल्या बाईक्सवर एकापेक्षा एक अशा वरचढ ऑफर्स देत आहेत. यामाहाने देखील आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स आणले आहेत.

(Source)

यामाहाने ग्राहकांसाठी कमी डाउन पेमेंट ऑफर आणली आहे. केवळ 4,999 रूपये देऊन तुम्ही कंपनीची स्कूटर अथवा बाइक (ठरावीक मॉडेल) घरी घेऊन जाऊ शकता. पेमेंट आणि ईएमआयसाठी तुम्ही यामाहा डिलरशीपशी संपर्क करू शकता.

(Source)

याशिवाय कंपनी केवळ 6.9 टक्के व्याज दराची ऑफर देत आहे. याशिवाय यामाहाची बाइक अथवा स्कूटर खरेदी केल्यास तुमची 8,280 रूपयांची बचत देखील होईल. या सर्व ऑफर्स 31 ऑक्टोंबरपर्यंतच लागू आहेत. याशिवाय पेटीएम मॉलमधून खरेदी केल्यास 7 हजारांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.

जर तुम्ही यामाहाची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासासाठी सुवर्ण संधी आहे. कमी डाउन पेमेंट आणि ऑफर्समुळे तुमची मोठी बचत होईल.

Leave a Comment