
नवी दिल्ली : भारतीय नागरिकांचा किती पैसा स्विस बँकेत आहे, हा विषय नेहमीच कुतूहलाचा असतो. पण आता लवकरच स्विस बँकेत काळा पैसा लपवणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने भारत सरकारला स्विस बँकेत असलेल्या भारतातील खातेदारांनी माहिती बँकेने सोपवली आहे.
स्वित्झर्लंड सरकारने सोपवली स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेदारांची यादी
सरकारने स्विस बँकेत 75 देशातील 3.1 मिलियन म्हणजे 31 लाख खातेदारांची माहिती त्या-त्या देशांना सोपवली आहे. स्विस बँकेने यात काही भारतीय खातेदारांची माहिती भारताला सोपवली आहे. तर स्विस बँक भारताला पुढील वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये आणखी खात्यांची माहिती देणार आहे. काळा पैशांविरोधातील लढाईतील हे महत्त्वाचे मानले जात आहे. काही निवडक देशांनाच आपल्या खात्यांची माहिती स्विस बँकेने दिली आहे.
बँकिंग माहितीच्या देवाण-घेवाण संबंधीचा करार (ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन) भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये झाला असल्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती उघड होणार हे निश्चित झाले होते. स्वित्झर्लंड सरकारने या करारानुसार स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला दिली आहे.
