इम्रान खानच्या इज्जतीचा मोहम्मद कैफने केला पंचनामा


नवी दिल्ली – काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. हे कलम रद्द करण्याबाबत अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या होत्या, पण अखेर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ मध्ये हा निर्णय जाहीर केला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे धाबे दणाणल्यानंतर भारताविरूद्ध टोकाची मते मांडली. तसेच आपली मते संयुक्त राष्ट्र संघाच्या एका परिषदेत व्यक्त केली. त्यावेळी दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे इम्रान खान म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने जहरी टीका केली.


मोहम्मद कैफ याने इम्रान खान यांच्यावर टीका करताना दहशतवादाला धर्म नसतो. पण पाकिस्तानला दहशतवादाविरोधात खूप काही करणे गरजेचे आहे. दहशतवादी हे पाकिस्तानच्या भूमितूनच तयार होत आहेत. पाकिस्तानच्या धरतीवरच दहशतवादाला मूळ खतपाणी मिळते आहे. संयुक्त राष्ट्र संघमधील तुमचे भाषण आणि एक महान क्रिकेटपटू ते पाक लष्कर, दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले ही तुमची घसरण खूपच दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment