जर तुम्हाला उत्तर ध्रुवावरील इग्लू (बर्फाचे घर) थीम हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मात्र यासाठी तुम्हाला तब्बल 1 लाख डॉलर म्हणजेच तब्बल 71 लाख रूपये खर्च करावे लागतील.
उत्तर धुवावरील हे इग्लू हॉटेल एप्रिल 2020 मध्ये उघडणार आहे. हे हॉटेल वर्षातून केवळ एक महिन्यांसाठीच उघडले जाते. त्यामुळे पर्यटकांसाठी असा अद्भूत अनुभव घेण्यासाठी नक्कीच एक चांगली संधी आहे.
हे हॉटेल लक्झरी अक्शन या ट्रॅव्हल कंपनीने बनवले आहे. इग्लू हॉटेल 10 गरम कांचापासून बनवण्यात आलेले आहे. एप्रिल महिन्यात या येथील तापमान हे 7-8 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहचते. आकड्यांनुसार, उत्तर ध्रुव भागात दरवर्षी केवळ 1 हजार लोक जातात.
1 लाख डॉलरच्या या पॅकेजमध्ये पर्यटकांना दोन रात्री स्वॅलाबार्ड आयलँड, नॉर्वे आणि एक रात्र इग्लू हॉटेलमध्ये घालवता येणार आहे. तसेच, या पॅकेजमध्ये प्रवास, जेवण इत्यादी गरजेच्या गोष्टी देखील मिळणार आहेत.