हा ‘पायजमा’ मोजणार तुमच्या ह्रदयाचे ठोके आणि श्वासाची गती


स्मार्टवॉचच्या मदतीने ह्रदयाचे ठोक मोजले जातात, हे तर तुम्हाला माहिती आहेच. मात्र आता संशोधकांनी स्मार्टवॉच प्रमाणेच असा पायजमा तयार केला आहे, जो सेंसरच्या मदतीने तुमच्या ह्रदयाचे ठोके आणि श्वासांची गती मोजू शकतो. अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्सच्या संशोधकांनी सांगितले की, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे जे झोपायच्या वेळी घालण्यासाठी असे कपडे तयार करेल की, ज्यामुळे आरोग्याची काळजी घेता येईल आणि आजारांच्या उपचारामध्ये देखील मदत होईल.

प्रोफेसर त्रिशा एल एंड्रयू यांनी सांगितले की, आम्ही अशा तंत्रज्ञानावर काम करत होतो, ज्याच्या मदतीने स्मार्ट कपडे तयार करता येतील. सेंसरच्या जागी कपड्यांचा अनुभव येणे असे कपडे बनवणे अवघड होते.

कॉम्प्यूटर वैज्ञानिक दीपक गणेशन यांनी सांगितले की, भलेही लोक झोपताना ढिला पायजमा घालत असतील. मात्र झोपताना त्याचे अनेक भाग शरीराला स्पर्श करतात. झोपे दरम्यान ब्लँकेटचा पायजम्यावर दबाव पडतो. यामुळे पायजाम्यावर लावण्यात आलेले सेंसर सक्रिय होतात आणि आपल्या ह्रदयाचे ठोके व श्वासांची गती मोजतात. संशोधकांनी ‘फॅब्रिक आधारित प्रेशर सेंसर’ बनवले आहे, जे शरिराशी संपर्क होताच सक्रीय होते.

संशोधकांनी सांगितले की, सध्याच्या पिढीला या कामासाठी स्मार्टवॉच आवडते. मात्र वृध्द लोक घड्याळ घालायला विसरतात. मात्र रात्री कपडे घालायला कोणीही विसरत नाही.

‘द प्रॉसिडिंग्स ऑफ द एसीएम ऑन इंटरॅक्टिव, मोबाईल, वेयरेबल अँन्ड युबीक्युट्स टेक्नोलॉजी’ या जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित झाला आहे.

Leave a Comment