चंद्राच्या कक्षेत चांद्रयान-2 चा यशस्वीरित्या प्रवेश


नवी दिल्ली – आज चंद्राच्या कक्षेत समस्त देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 2 ने प्रवेश केला असून याबाबतची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले होते. चांद्रयानाने सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.


चांद्रयान 2 ला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. चांद्रयान 2 पासून विक्रम लँडर 2 सप्टेंबरला वेगळा होईल. चंद्राच्या पृष्ठभागावर सात सप्टेंबरला लँडर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

Leave a Comment