डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खानला काश्मीर मुद्द्यावरुन झापले


नवी दिल्ली – सोमवारी रात्री उशीरा अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याला सुद्धा ट्रम्प यांनी फोन केला होता. ट्रम्प यांनी याबाबतची माहिती ट्विट करत स्वतः दिली आहे. दोन्ही देशांना जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन पेटलेला वाद-तणाव कमी करण्याचा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे.


ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा इम्रान खान यांच्यासोबत या विषयावर बातचीत केली होती. तर ट्विट करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, आमचे इम्रान खान आणि नरेंद्र मोदी हे दोघे चांगले मित्र असून या दोन्ही देशातील व्यापार, समान भागीदारी आणि काश्मीरच्या मुद्द्यावर तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मोदी यांच्यासोबत झालेल्या बातचीत मध्ये पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात येत असलेला राग हा देशाची शांती भंग करत आहे. तर मोदी यांनी ट्रम्प यांना सीमेवरील वाढता दहशतवाद यावर चाप बसावा याबद्दल चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment