
चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची अभिनेता रजनीकांत यांनी कृष्ण आणि अर्जुनाशी तुलना केली आहे. कृष्ण-अर्जुनासारखी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी असल्याचे वक्तव्य अभिनेता रजनीकांत यांनी केले आहे. रजनीकांत यांनी मोदी आणि अमित शहांचे जम्मू-काश्मीरशी संबंधीत असणारे कलम ३७० रद्द केल्यामुळे अभिनंदनही केले.
रजनीकांतने मोदी-शहांवर उधळली स्तुतीसुमने
रजनीकांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तसेच अमित शहा यांना मिशन काश्मीरसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीमधील दहशतवाद संपेल. तसेच जम्मू काश्मीर विकासाच्या दिशेने माग्रक्रमण करेल असेही रजनीकांत म्हणाले.
