
2014 साली आलेल्या हिरोपंती या चित्रपटाद्वारे टायगर श्रॉफसोबत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री कृति सेननने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटोशूट तिने ‘इंडिया टुडे ग्रुप’साठी केले असून या फोटोशूटमध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे.
कृति सेनन म्हणते ‘नववधू प्रिया मी बावरते’
तिचा हा समर ब्राइड लुक पाहताच तिच्या चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. कृतिने या खास फोटोशूटसाठी तरुण तहिलियानीचे लेटेस्ट कलेक्शन परिधान केले आहे.
तर तिने दुस-या एका फोटोत फ्लोरल डिजाइन असलेला फलकनुमा लहेंगा परिधान केला आहे. कृतिचे सौंदर्य या लेहंग्यामध्ये अधिक खुलून आले आहे. त्याचबरोबर जेव्हा भविष्यात लग्न करेन तेव्हा अशाच प्रकारे नटायला आवडेल. खरच सगळे काही खूप स्वप्नवत माझ्यासाठी असे कृतिने सांगितले आहे.
सा-यांचे लक्ष तिने तिच्या या फोटोशूटने वेधले आहे. ‘लुका छिपी’, ‘कलंक’ आणि ‘अर्जुन पटियाला’ यासारख्या चित्रपटात कृति झळकली होती.
