बिनालग्नाची आई होणाऱ्या अभिनेत्रीने शेअर केला टॉपलेस फोटो


लवकरच बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आई होणार असून तिच्या गरोदरपणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच सुरू आहेत. त्यामागे कारण देखील तसेच आहे. तिने सध्या गरोदर असलेल्या दरम्यानचे बिनधास्त फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. आता तर चक्क बेबी बम्प फ्लॉन्ट करणारा टॉपलेस फोटो एमीने शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने स्वत:चे हेल्थ अपडेटही दिले आहेत.


गरोदरपणाच्या 33 व्या आठवड्यात आपल्या शरीरात कुठले बदल झाले आहेत, हे तिने या माध्यमातून सांगितले आहे. एमीने या टॉपलेस फोटोत एक मोठी हॅट घातली आहे. तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘ग्रीस? नाही. संपूर्ण उन्हाळा मी आणि माझ्या बाळाने बगिच्याच्या मागे काढला. त्याची एक झलक पाहण्याची प्रतीक्षा आहे. प्रेग्नंसीचा हा 33 वा आठवडा असून या काळात बम्प, स्ट्रेच मार्क, वेट गेन हे सगळे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

We woke up in Italy! PASTA FOR BREKKY!!!

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on


एमी तिच्या बाळाच्या आगमनासाठी तिने शेअर केलेला हा फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन वाचून किती आतूर आहे, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. सध्या प्रेग्नंसीदरम्यानचे एमीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.


बॉयफ्रेन्ड जॉर्जसोबत एमीने यावर्षी नवीन वर्षांच्या संध्येला साखरपुडा केला होता. ती त्यावेळी दोन महिन्यांची गरोदर होती. एमी व जॉर्ज बाळाच्या जन्मानंतर पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.


‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबचा जॉर्ज मालक आहे. जॉर्ज एमीला डेट करण्यापूर्वी पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

Leave a Comment