
बॉक्स ऑफिसवर हुकमी यश मिळवणारी जोडगोळी म्हणून सुपरस्टार अक्षय कुमार आणि दिग्दर्शक नीरज पांडे यांची जोडी ओळखली जाते. दोघेही आता पुन्हा एकदा नवा धमाका करण्यासाठी सज्ज होत आहेत. या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा चरित्रपट निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.
अजित डोवालांच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार
खूप चित्तथरारक असे अजित डोभाल यांचे जीवन असून त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील तेवढाच थ्रिलींग अनुभव असू शकतो. सध्या त्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याचे समजते. या विषयावर काम करताना खूप रिसर्च आवश्यक आहे. अजय देवगणसोबत चाणक्य हा चित्रपट सध्या नीरज पांडे बनवित आहेत. तो पूर्ण झाल्यावरचा या चित्रपटाचे काम खऱ्या अर्थाने सुरू होईल.
