अजित पवारांनी गिरीश महाजनांना दिली ‘नाच्या’ची उपमा


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची गिरीष महाजनांवर टीका करताना जीभ घसरली असून जिल्ह्यात पूर आलेला असताना मंत्री महोदय मात्र वेगळ्याच गोष्टीत मग्न असल्याचे म्हणाले आहेत. अजित पवार शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

अजून काही गोष्टी राज्यात घडतील. काही लोक थांबतील, तर कोणी निघून जाईल. पण आपले उमेदवार सगळ्या भागातून निवडून आले पाहिजेत. राज्यात आघाडीच्या 175 जागा आपल्याला निवडून आणायच्या असल्याचेही अजित पवार म्हणाले. राज्यात इतर पक्षांच्या यात्रा सुरू असताना राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शिवजन्मभूमीतून निघाली आहे. 2014 मध्ये छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भाजपने प्रचाराला सुरुवात केली होती. आता राष्ट्रवादी देखील संभाजी राजेंच्या मालिकेतून प्रसिद्ध झालेला चेहरा शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घेऊन राज्यात फिरवणार आहे.

Leave a Comment