
वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने घेतला. सध्या काश्मीरच्या घाटीत भारतीय लष्करासोबत धोनी ड्यूटीवर आहे. जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळतानाचा त्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर आता धोनीचा एक हटके फोटो तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल; चक्क बूट पॉलिश करत आहे धोनी
This Man ❤️❤️❤️
True Idol 🙏🙏#MSDhoni pic.twitter.com/9uHLoG72nZ— रोहित WAR (@WAR_TheYudhh) August 5, 2019
धोनी व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सैनिकी वेशात असून ट्रेनिंगआधी तो आपले बूट पॉलिश करताना दिसत आहे. हा फोटो धोनीच्या चाहत्याने आपल्या ट्विटर अकांउट वरुन शेअर केला आहे.
महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्कराकडून लेफ्टनंट कर्नल हे मानाचे पद बहाल करण्यात आले आहे. धोनीने यापूर्वी भारतीय लष्करासोबत काम करण्याचे, अनेक वेळा बोलून दाखवले होते. त्यामुळे त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत जवानांसोबत आपला वेळ घालवत आहे.
