फाळणीनंतर बदलला काश्मीरचा भुगोल, आजही अर्धा काश्मीर आहे पाकिस्तानच्या ताब्यात - Majha Paper

फाळणीनंतर बदलला काश्मीरचा भुगोल, आजही अर्धा काश्मीर आहे पाकिस्तानच्या ताब्यात


देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. विभाजनाच्या वेळीच पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला करत काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले होते. मात्र पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी युद्ध मधेच थांबवले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक नियंत्रण रेखा आखली गेली. तेव्हापासून काश्मीर एक विवादित क्षेत्र झाले आहे. आजही अर्ध्या काश्मीरवर पाकिस्तानचा ताबा असून, त्याला पाक व्याप्त काश्मीर असे संबोधले जाते.

भारताच्या उत्तरी राज्याच्या क्षेत्रात जम्मू, काश्मीर आणि लद्दाख आहे. हे तिन्ही क्षेत्र एका राज्याच्या ताब्यात होती. राज्य घोषित होताच लद्दाखला देखील जम्मूमध्ये समावेश करून, राज्याचे नाव जम्मू-काश्मीर ठेवण्यात आले.

भारतीय पौराणिक कथांनुसार, जम्मूला डुग्गर प्रदेश म्हटले जाते. जम्मूमध्ये जम्मू, सांबा, कठुआ, उधमपुर, डोडा, पुंछ, राजौरी, रियासी, रामबन आणि किश्तवाड़ हे 10 जिल्हे आहेत. याचे क्षेत्रफळ 36,315 वर्ग किमी आहे. तर 13,297 वर्ग किमी भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तान त्या भागाला आझाद काश्मीर म्हणतो. जम्मूची लोकसंख्या जवळपास 5.02 लाख असून, उर्दु, हिंदी, डोगरी, पंजाबी या भाषा बोलल्या जातात.

जम्मूचे क्षेत्रफळ हे पीर पंजाल शिखरात समाप्त होते. याच शिखरांच्या पलीकडे काश्मीर आहे. काश्मीरचे क्षेत्रफळ 222,236 वर्ग किमी आहे. यामध्ये श्रीनगर, बड़गाम, कुलगाम, पुलवामा, अनंतनाग, कूपवाड़ा, बारामूला, शोपियां, गन्दरबल, बांदीपुरा हे जिल्हे आहेत. येथे सुन्नी, शिया, बहावी, अहमदिया मुसलमानांबरोबरच हिंदू, देखील राहतात. काश्मीरची एकूण लोखसंख्या 1.25 करोड आहे. येथे उर्दु, हिंदीबरोबरच एकूण 19 भाषा बोलल्या जातात. येथे 68.1 टक्के लोकसंख्या मुसलमान आहे.

प्राचीन काळात लद्दाख व्यापारी रस्त्यांठी प्रसिध्द होते. याचे एकूण क्षेत्रफळ 59,196 वर्ग किमी आहे.  एवढ्या मोठ्या क्षेत्रात केवळ 274,289 लोक राहतात.  येथे लद्दाखी, पुरकी, शीना, तिब्बती, हिंदी, बाल्टी आणि उर्दु भाषा बोलली जाते.  असे समजले जाते की, लद्दाख एका झऱ्याखाली डुबलेला भाग आहे.  18 व्या शतकात लद्दाख आणि बाल्टिस्तान ला जम्मू-काश्मीरमध्ये सामिल करण्यात आले. 1947 मध्ये फाळणीवेळी बाल्टिस्तान पाकिस्तानचा हिस्सा झाला.  लेहच्या आजूबाजूला राहणारे लोक प्रामुख्याने, तिब्बती, बौध्द आणि हिंदू आहेत. मात्र पश्चिम कारगिल भागात बहुसंख्य भारतीय शिया मुस्लिम राहतात.

हिमालयाच्या शिखरांमध्ये वसलेल्या जम्मू-काश्मीर मुख्यतःतीन भागआहेत –काश्मीर, जम्मू आणि लद्दाख. यामध्ये अक्साई चीनला देखील जोडले जाते. भौगोलिक स्थितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 5 समूह आहेत. जम्मू-काश्मीर आणि लद्दाख भारताच्या उत्तरी भागात एक संयुक्त राज्य होते. उत्तरेला चीन आणि अफगाणिस्तान, पुर्वेला चीन आणि दक्षिणमध्ये हिमाचल प्रदेश, पंजाबच्या सिमा आहेत. पश्चिमेला पाकिस्तानच्या उत्तर-पश्चमि फ्रंटियर आणि पंजाबच्या सिमा आहेत. येथे दोन राजधान्या आहेत – ग्रीष्मकालीन राजधानी श्रीनगर आणि शीतकालीन जम्मू.

पाक व्याप्त काश्मीर –
13,297 वर्ग किमीचा भागावर पाकिस्तानने 1947 मध्ये कब्जा केला आहे. भारतात घुसखोरी करणारे आतंकवादी याच भागातून येतात. या भागाची एकूण लोकसंख्या 44.50 लाख आहे. 10 जिल्हे असणाऱ्या या भागाला पाकिस्तान आझाद काश्मीर असे म्हणतो. येथे पाकिस्तानच्या मदतीने चालणारी सरकार आहे. त्या भागाची राजधानी मुजफ्फराबाद आहे. तर राष्ट्रपती मसूद खान आणि पंतप्रधान रजा फारूक हैदर आहे. 24 ऑक्टोंबरला या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

Leave a Comment