
संपूर्ण भारतासाठी ५ ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक दिवस ठरला असून भारतीय संविधानातील जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधून लद्दाखचेही विलगीकरण करण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रातून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाक अभिनेत्री वीणा मलिकने भारताविरोधात ओकली गरळ
पण, सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने याबाबत एका ट्विटद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. तिने आपल्या ट्विटमधून भारतीय लष्कराचा अपमान करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिला तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिने ‘To The Indian Brutality In Kashmir#IndianarmyinKashmir #indianArmy’अशा शब्दांसह अपमानास्पद इशारा देणारा स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे.
भारतीय लष्कराचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, लाज वाटली पाहिजे तुला, कामाची भीक मागण्यासाठी बॉलिवूडमध्ये पुन्हा येऊ नको. आता तुला भारतात प्रवेश नाही, अशा आशयाच्या कमेंट्स सोशल मीडियावर तिच्या या पोस्टनंतर उमटू लागल्या आहेत.
